मराठी मतं ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकणार?

0
11

दि.११(पीसीबी)-मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. तब्बल वीस वर्षांनंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले असून, दोन्ही ठाकरे बंधूंनी युती जाहीर करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या युतीचा प्रत्यक्ष फायदा किती होणार, मराठी मतदार ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकणार का, आणि त्याच जोरावर मुंबईत विजय मिळवता येणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई तक’ या वृत्तवाहिनीने ‘सी-वोटर’च्या माध्यमातून एक सर्वेक्षण केले आहे.

ठाकरे अजूनही सर्वात ‘मोठा ब्रँड’?
“ठाकरे अजूनही सर्वात मोठा ब्रँड आहेत का?” असा प्रश्न मराठी आणि हिंदी भाषिक मतदारांना विचारण्यात आला.

मराठी भाषिकांचे मत
हो : 49.2 टक्के
कमकुवत झालेत : 25.3 टक्के
ब्रँड नाही : 9.3 टक्के
सांगता येत नाही : 16.2 टक्के

हिंदी भाषिकांचे मत
हो : 24 टक्के
कमकुवत झालेत : 48.4 टक्के
ब्रँड नाही : 14.2 टक्के
सांगता येत नाही : 13.3 टक्के

मराठी मतं ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकणार?
“मराठी मतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकतील का?” असा सवालही मतदारांना विचारण्यात आला.

मराठी भाषिक
हो : 54.8 टक्के
कदाचित हो : 8.3 टक्के
नाही : 12.8 टक्के
नक्की नाही : 12.7 टक्के
सांगता येत नाही : 11.3 टक्के

हिंदी भाषिकांचे मत
हो : 42.1 टक्के
कदाचित हो : 11.1 टक्के
नाही : 14.8 टक्के
नक्की नाही : 9.9 टक्के
सांगता येत नाही : 22.2 टक्के

मुंबईचा महापौर मराठीच असावा?
या प्रश्नावरही मराठी आणि हिंदी भाषिकांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मराठी भाषिकांचे मत

हो : 69.9 टक्के
नाही : 14.9 टक्के
सांगता येत नाही : 15.3 टक्के
हिंदी भाषिकांचे मत
हो : 23.2 टक्के
नाही : 51.4 टक्के
सांगता येत नाही : 25.4 टक्के

दरम्यान, ‘सी-वोटर’ सर्व्हेनुसार मराठी मतदारांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. मात्र हिंदी भाषिक मतदारांमध्ये या युतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती मराठी मतांच्या जोरावर मुंबई मनपा निवडणुकीत किती प्रभाव टाकते, हे येत्या निवडणूक निकालातूनच स्पष्ट होणार आहे.