मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा; आमदार अमित गोरखे यांची माहिती

0
21

पिंपरी, दि. ९ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आली आहे.

ही जाहीर सभा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता, आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात पार पडणार आहे. या सभेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा, तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावेळी मांडण्यात येणार आहे. या सभेला पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या जाहीर सभेच्या आयोजनाबाबतची माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ही सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सभेसाठी पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे तसेच निवडणूक प्रमुख तथा चिंचवड शहराचे आमदार शंकर शेठ जगताप भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे विधान परिषद सदस्य उमाताई खापरे यांच्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व भाजपा अधिकृत उमेदवार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील.