दि.०९(पीसीबी)-पुण्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. अजितदादांच्या एका विधानानं अख्खी भाजपचं त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच दादांच्या विधानावर व्यक्त व्हावे लागले. दादांनी दुसरा मोठा डाव टाकला आहे. पुण्यात भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीतील हे द्वंद पार जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत सुरू राहण्याची दाट शक्यता आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांची आणि अजितदादांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे समोर येत आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. ११ वर्षांनंतर बुट्टे पाटील पुन्हा “स्वगृही” परतणार का, यावर आता जिल्ह्यात चर्चा रंगली आहे, तर हे वृत्त समोर येताच भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडल्याचे समजते. दादांना घेरता घेरता, भाजपचेच मोहरे दादा पळवत असल्याची चर्चाही पुण्यात जोर धरू लागली आहे. त्यामुळे पुण्याच्या रणांगणात दादांनी फासे आवळायला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषद निवडणुकीचे डावपेच सुरु









































