भाजपाचे “विकासाचे व्हिजन” सर्वमान्य; संघटनेचे बळ वाढतेय- शंकर जगताप

0
48

दि.०3(पीसीबी)- डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी धक्का दिला आहे. आदल्या दिवशी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. उमेदवारांना दबावाखाली माघार घ्यायला लावत असल्याचे आरोप केले.आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी केलेले आरोप खोटे ठरवत भर सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपची पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या भागात ताकद वाढली आहे.

शनिवारी प्रचाराचा नारळ फोडताना माजी नगरसेवक (प्रभाग क्रमांक 17 मधील) ॲड. संदीप चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, (प्रभाग क्रमांक 32) सुषमा तनपुरे, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, तसेच संदिप श्रीधर वाल्हेकर यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भक्ती शक्ती समूह शिल्पा जवळ प्रचाराचा शुभारंभ करताना प्रवेश करण्यात आला. आणि या प्रवेशामुळे नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव भागातील भाजपची ताकद वाढणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी

भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर केव्हाही, कधीही अन्याय करत नाही. विरोधक तथ्यहीन आरोप करतील मात्र आम्ही विकासाच्या गोष्टीतून त्यांना पिंपरी चिंचवडचे नवे पर्व दाखवून देणार आहोत.बोलायला जेव्हा मुद्दे कमी पडतात तेव्हा आरोपांच्या फैरी झडतात. आजच्या पक्ष प्रवेशाने हेच दाखवून दिले आहे. टीकेवर टीका करत राहिलो तर विकासाचा मुद्दा मागे पडेल म्हणून आम्ही “विकासाच्या व्हिजन”वर बोलणार आहोत.