भाजपने पिंपरी चिंचवड शहरात खाते खोलल्यात जमा आहे.
भोसरीमधील धाव़ेवस्ती प्रभाग क्रमांक ६ मधे भाजपने माजी नगरसेवक रवी लांडगे यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीत बाद झाला. मनसेचे उमेदवार निलेश सुर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र नसल्याने बाद झाला. राष्ट्रवादीने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी दिली होती मात्र, त्यांचा अर्ज आला नाही. दरम्यान, बिनविरोध निवडिची घोषणा माघार अर्जाची मुदत संपल्यानंतर जाहीर होणार आहे.
गेल्यावेळी २०१७ मध्येसुध्दा रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती. भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे सख्खे पुतणे असलेल्या रवी लांडगे यांनी गतवर्षी भोसरी विधानसभेत उमेदवारीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महिन्यापूर्वी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.











































