मोशी प्रभाग क्रमांक २ मधील भाजप उमेदवार राहुल जाधव आणि निखील बाऱ्हाडे यांच्या उमेदवारीची अदलाबदल करणाऱ्या पत्रावर आक्षेप घेण्यात आला असून तणाव आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत बोराटे यांच्यासह तीन उमेदवारांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि ही गंभीर बाब उघड केल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रकऱणात निवडणूक निर्णय अधिकारी चालढकल करत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष काटे यांनी दिलेल्या पत्रावर सही, शिक्का नाही तसेच आवकजावक वहितसुध्दा नोंद नसल्याने प्रकरण गंभीर झाले आहे.











































