पिंपरी, दि. ३० – प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी-बिजलीनगर मधून भाजपचे प्रबळ दावेदार शेखर चिंचवडे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला. शेखर यांच्या पत्नी या भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांना भाजपने संधी दिल्याने तिथे सचिन आणि शेखर चिंचवडे यांच्यातील पारिवारीक लढत पहायला मिळणार आहे.












































