संकल्प विकासाचा, शंखनाद विजयाचा;विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी!

0
7

पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास
जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

दि.२७(पीसीबी)-पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लक्षवेधी विकासकामे झाली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत या प्रभागातून सर्वप्रथम चारही नगरसेवक निवडून येतील, असा मला विश्वास आहे. भाजपाकडून इच्छुक असलेल्या प्रभागातील 12 उमेदवारांमध्ये कोणताही मनभेद नाही. ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांचे काम आम्ही ‘भाजपा परिवार’ म्हणून करणार आहोत, अशी भावना भाजपाचे उमेदवार आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे नगरसेवक उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वात प्रभाग क्र. 28 (पिंपळे सौदागर-रहाटणी) क्षेत्रात जोरदार प्रचार सुरू केला आहे. ग्रामदेवत श्री मुंजोबा मंदिरात आशिर्वाद घेण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पासमोर नतमस्तक होत प्रचाराचा शंखनाद केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, नागरिक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभागात फाईव्ह गार्डन, शिवार गॉर्डन, प्लनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ लॅक, गोविंद गार्डन यासारख्या प्रमुख वस्ती क्षेत्रात शत्रुघ्न काटे यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे सौदागर आणि रहाटणी क्षेत्रात बऱ्याच विकासकामांचा लाभ झाला आहे. त्याचबरोबर काटे यांची ओळख एक कार्यक्षम, नागरिकाभिमुख नेता म्हणून होत आहे. माझ्या प्रभागाच्या विकासासाठी, लोकांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी एकजूट आणि समर्पणाच्या साथीने हा विजय प्राप्त करू,” अशी ठाम घोषणा त्यांनी केली.

“माझ्या प्रभागाच्या प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी, त्याच्या विकासासाठी आणि त्याच्या जीवनाच्या दर्जाच्या सुधारण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. आपल्यासमोर असलेल्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि प्रगतीची नवी दिशा दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे कार्य केले आहे, त्यात आम्ही अधिक योगदान देणार आहे. पिंपळे सौदागर, रहाटणी आणि या क्षेत्रातील सर्व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम आम्ही खंबीरपणे सुरू ठेवणार आहे. पिंपळे सौदागर- रहाटणीसह पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
– शत्रुघ्न काटे, उमेदवार, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.