अजितदादांच्या स्टार प्रचारक यादीत कोणकोणत्या नेत्यांना संधी?

0
7

दि.२५(पीसीबी)-राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची या निवडणुकांसाठी युतीची घोषणा झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या देखील युतीसंदर्भात चर्चा सुरु आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीची देखील एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महानगरपालिकांसाठी राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोणकोणत्या नेत्यांनी संधी मिळाली, याबाबतची माहिती पाहुयात.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महानगरपालिकांसाठी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 40 जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये युवा नेत्यांनी देखील संधी देण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


अजितदादांची फौज मैदानात, धनंजय मुंडे, मिटकरी ते चाकणकरांची तोफ धडाडणार, 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.