महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून

0
3

मुंबई, दि. २३ राज्यात होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोण हस्तगत करणार याची देशभर उत्सुकता लागली आहे. दोनच दिवसांपूर्वी लागलेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निकालांची छाप महानगरपालिका निवडणुकीत पडण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. महायुती किंवा महाविकास आघाडी एकत्र लढणार की नगरपालिकांप्रमाणे स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हे येत्या चार-पाच दिवसांत स्पष्ट होईल.

प्रमुख पक्षांचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे मंगळवारी पहिल्या दिवशी राजकीय पक्षांच्या अर्जांची शक्यता कमी आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. उद्यापासून ते ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. राज्यातील पाच महानगरपालिकांची मुदत ही सहा वर्षांपूर्वी संपली आहे. तर मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यात गेली चार वर्षे प्रशासकराज आहे. खरी चुरस ही मुंबई महानगरपालिकेत आहे. मुंबईची सत्ता बळकाव ण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. राज्यात कुठेही महायुती झाली नाही तरीही मुंबईत ठाकरे बंधूंचे आव्हान लक्षात घेता भाजप शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करणार हे निश्चित. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही मुख्यमंत्री देवेंद्र (पान ४ वर) (पान १ वरून) फडणीस, ठाणे, कल्याण-़डोंबिवलीची निवडणूक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे, पिंपरी-चिंचवडची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

विरोधी महाविकास आघाडीत एकवाक्यता दिसत नाही. मुंबईत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. नगरपालिका निकालानंतर महाविकास आघाडीने एकत्र लढण्याबाबत विचार केला पाहिजे, अशी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये भावना तयार झाली आहे. भाजप किंवा महायुतीचे पारडे जड आहे हे निर्माण झालेले वातावरण मोडून काढण्याचे आव्हान महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार गटापुढे असेल.