Home Others भाजपने दहशतीच्या जोरावर ही निवडणूक जिंकली..
- गौरव चौधरी
राज्यात झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत च्या निवडणुकीत ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य जास्त आहे अशा ठिकाणी अधिकाराचा गैरवापर, प्रशासन,पोलीस व्यवस्था यांना असलेल्या सत्तेच्या माध्यमातून दबाव तंत्र निर्माण करत. प्रचंड पैशाच्या जोरावर ही निवडणूक राज्यभरात पार पडली.
मतदार यादी मध्ये असलेल्या प्रचंड घोळ त्यात असंख्य दुबार मतदार अनेक ठिकाणी बनावट आधार कार्ड,नातेवाईक याना उमेदवारी,बोगस मतदान करत मतदानाच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी अनेक ठिकाणी सर्व पद्धतीचा दबाव तयार करून ही निवडणूक जिंकली , असा आरोप काँग्रेस प्रवक्ते गौरव चौधरी यांनी केला आहे .
पत्रकाततेम्हणतात , काँग्रेस पक्षाने यामध्ये अनेक ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत आघाडी करत ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढली आणि आज देखील काँग्रेस हा पक्ष जनाधार असलेला पक्ष आहे हे अधोरेखित होते. अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाला मिळालेला विजय हा स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे.
राज्यातील अनेक शेतकरी लघुउद्योजक बेरोजगारीने त्रस्त असणारे तरुणांनी काँग्रेसला मतदान केले आहे. महाविकास आघाडीला यापुढील काळात प्राधान्य मिळतांना दिसेल