जेजुरीत अजित पवारांनी नगराध्यक्ष पदासह 17 जागा जिंकल्या

0
3

जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोठे यश मिळवले आहे.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी निर्णायक विजय मिळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे एकूण 17 उमेदवार विजयी झाले असून नगरपरिषदेत पक्षाची भक्कम पकड निर्माण झाली आहे. भाजप गटाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. तर तानाजी खोमणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या निकालामुळे जेजुरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.