- राजू मिसाळ, अमित गावडेंच्या भाजप प्रवेशाला कडवा विरोध
निगडी, दि. १९ – भाजपकडे सक्षम उमेदवार असतानाही आयात उमेदवाराला संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने निगडी प्राधिकरणात उद्रेक झाला. माजी उपमहापौर राजू मिसाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आणि अमित गावडे हे शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश कऱणार असून त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे समजते. दरम्यान, याची खबर लागल्याने भाजपच्या आठ निष्ठावंतानी आज दिवसभर आत्मक्लेष आंदोलन केले आणि बाहेरच्या कोणाला उमेदवारी दिली तर बंडखोरीचा इशारा दिला आहे.
माजी महापौर आर.एस. कुमार म्हणाले, आमच्या आठ इच्छुकांपैकी कोणालाही संधी द्या अन्यथा आम्हाला आमचे अस्तित्व टिकविण्यासाठी बंडखोरी करावीच लागेल.
दुसरे इच्छुक उमेदवार सलिम शिकलगार म्हणाले, केंद्र आणि राज्याचे सर्व कार्यक्रम, योजना आम्ही इमानेइतबारे जनतेपर्यंत पोहचविल्या. नेत्यांच्या आदेशानुसार भाजपची सदस्य नोंदणीसुध्दा केली. आता इतक सर्व करूनही तुम्ही बाहेरच्या आयात माणसाला उमेदवारी देत असाल तर मग निष्ठावंत कार्यकर्त्याची व्याख्या काय ते तरी सांगा. आमच्याकडून काय चुकते ते सांगा. आम्ही सर्वदृष्टीने समर्थ आहोत.
अरुण थोरात म्हणला, आमचा विरोध आहे., २०१६ ला उमेदवारी दिली होती. ८००० मतदान पडले. कमळावर पाकळ्या दिल्या. प्राधिकरणात रोपटे लावले हे
- अतुल इनामदार – आज बालेकिल्ला झालाय तो आमच्या कष्टाने झालाय. आता आयते बाहेरचे उमेदवार येणार म्हणून आत्मक्लेष आहे.
- विजय शिनकर म्ह – २००७ ला माझ्या पत्नीला उमेदवारी दिली होती, दुसऱ्या क्रमांकावर होती. नंतरही पूर्ण बांधनी केली आता आमच्या ८ पैकी कोणालाही द्या आम्ही तण, मन धन लावून निवडूण आणू. त्यांना तिकडे स्थान राहिलेले नाही.
- समिर जावळकर म्हणाले, बाहेरचा उमेदवार थोपवला गेला तर विरोधाचीच भूमिका घेतली जाईल. नंतर आम्ही आमचे दोन उमेदवार लढविणार म्हणजे लढविणार. जे कोणी भाजपमध्ये येणारे आहेत त्यांना त्यांच्या पक्षात स्थान राहिलेले नाही.















































