साधना नेताजी काशिद यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
30

दि.१६(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. अनेक बलाढ्य़ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सलग दोन वेळा प्रभाग क्रमांक दोन मधून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेले शिवसेनेचे नेताजी काशिद यांनी पत्नी सौ. साधना आणि आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उभयतांचे स्वागत केले.

चिखली, तळवडे परिसरातील प्रभावी कार्यकर्ते म्हणून काशिद यांचा मोठा जनसंपर्क आणि कार्य आहे. शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते असलेल्या काशिद यांचा दोन वेळा निसटता पराभव झाला. आता त्यांच्या पत्नी साधना नेताजी काशिद यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात येणार आहे.माजी नगरसेविका अश्विनी जाधव आणि रुपाली आल्हाट यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विकास साने, यश दत्ता साने, संगीता प्रभाकर ताम्हाणे आदी यावेळी उपस्थि होते.