दि.१६(पीसीबी)-माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांच्या पत्नी विद्या उल्हास शेट्टी यांचे नाव आता प्रभाग क्रमांक १४ मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी मधून चर्चेत आले आहे. महिला राखीव जागेवर त्यांना संधी देण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.
आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर परिसरात जगदिश आणि उल्हास या दोघा शेट्टी बंधूंचे मोठे वर्चस्व आहे. जगदिश शेट्टी स्वतः पाच वेळा लढले आणि चार वेळा जिंकून आले. उल्हास शेट्टी हेसुध्दा २ वेळा याच प्रभागातून नगरसेवक होते. आता यावेळी महिला राखीव मधून विद्या शेट्टी यांचे नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.
शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याच प्रभागातून त्यांची उमेदवारी निश्चित कऱण्यात आली असून आता या पॅनलमध्ये उल्हास शेट्टी यांच्या पत्नी विद्या शेट्टी यांना संधी मिळणार असल्याने पूर्ण पॅनल ताकदिचा होणार आहे.











































