दि.१२ (पीसीबी)-आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये धोरणात्मक हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली बैठक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीचा तपशील सांगताना स्पष्ट केले की, “महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. चर्चेला सुरुवात झाली आहे. जिथे अडचणी येतील तिथे वरिष्ठ स्वतः हस्तक्षेप करतील” असे त्यांनी सांगितले. रविंद्र चव्हाण यांच्यासोबतची कालची बैठकही याच पार्श्वभूमीवर झाली.
“कोणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्न नाही. महायुती मजबुतीने उतरेल. आमच्याकडे विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. मागील साडेतीन वर्षांत घेतलेल्या निर्णयांतून बदल घडवला आहे. जनता सूज्ञ आहे.”राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवणार का? या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बंडखोरीची शक्यता विचारल्यावर शिंदेंनी राजकीय वास्तव मान्य करत शांत प्रतिसाद दिला“इच्छुक अनेक असतात. तिकीट न मिळालेल्यांना तालुका, जिल्हा आणि स्थानिक कमिट्यांमध्ये सामावून घेण्याची व्यवस्था आहे.”
शेवटी त्यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या एकत्र लढण्याचा दावा ठामपणे करत सांगितले लाडकी बहिण योजनेसह कोणत्याही योजनेत भेदभाव केला नाही. विकासात कोणाला कमी-जास्त पाहिले नाही.ही राजकीय हालचाल पाहता, महापालिका निवडणूक पूर्वतयारीला आता ‘गरम मोड’ लागल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे.असं मत त्यांनी व्यक्त केलं













































