दि.०७(पीसीबी)-गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीमध्ये २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोव्यातील अर्पोरा गावात मध्यरात्री ही आगीची घटना घडली आहे. शनिवारची रात्र ही नाईटक्लबमधील २५ लोकांसाठी शेवटची रात्र असेल असा विचारही कोणी केला नसेल, लोक नाईट क्लबमध्ये मजा करण्यासाठी आले होते, पण त्यांच्यावर अचानक काळाने घाला घातला. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील अर्पोरा परिसरातील एका नाईट क्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. सिलेंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बळी पडलेल्यांमध्ये बहुतेक गोवा नाईट क्लबमधील कर्मचारी होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेबाबत सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, बहुतेक मृत्यू भाजल्यामुळे झाले नाहीत तर गुदमरल्यामुळे झाले आहेत. २५ मृतांपैकी चार पर्यटक होते, तर उर्वरित हॉटेल कर्मचारी होते. हा नाईट क्लब उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील रोमियो लेनजवळील बर्च येथे आहे. २५ जणांपैकी २० जणांचा मृत्यू फक्त गुदमरून झाला आहे. तपासात असे दिसून आले की फक्त दोघांचा मृत्यू भाजल्यामुळे झाला, तर उर्वरित २३ जणांचा मृत्यू फक्त गुदमरून झाला. जर त्यांनी ही एक चूक केली नसती तर या २३ जणांचे जीव वाचवता आले असते.
२३ जणांचा मृत्यू गुदमरून झाला, तर दोन मृतदेह जळालेले आढळले. याचा अर्थ असा की फक्त तीन जणांचा जळून मृत्यू झाला; इतरांचा मृत्यू धुराच्या श्वासोच्छवासामुळे झाला. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री १ वाजण्याच्या सुमारास नाईटक्लबच्या स्वयंपाकघराजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला. स्फोट इतका मोठा होता की काही सेकंदातच आग संपूर्ण इमारतीत पसरली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की स्फोट झाला तेव्हा इमारतीच्या आत नियमित तयारी आणि बंद करण्याचे काम सुरू होते. गॅस गळतीमुळे स्फोट झाला.
स्फोट झाला तेव्हा बहुतेक कर्मचारी तळघर परिसरात होते. नाईट क्लबमध्ये स्फोट होताच भीतीच वातावरण पसरलं. बाहेर पळण्याऐवजी लोक तळघरात लपले. काय चाललंय ते कुणालाच समजत नव्हतं. आगीचा धूर संपूर्ण तळघरात पसरला आणि लोक स्वतःला वाचवण्यासाठी तिथे बसले पण गुदमरून मरण पावले. जर हे लोक तळघरातून निघून बाहेर पळाले असते तर कदाचित ते बचावले असते.
स्थानिक पोलिस, एफएसएल टीम आणि जिल्हा प्रशासनाने या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, तर जखमींची संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. डीजीपी म्हणाले की क्लबचे रूटीन प्रेपरेशन, गॅस कनेक्शन आणि बाहेर पडण्याच्या जागांची देखील तपासणी केली जाईल. सध्या, नाईट क्लब सील करण्यात आला आहे आणि मालकांची चौकशी केली जात आहे.”बर्च बाय रोमियो लेन” नावाच्या नाईट क्लबमध्ये मध्यरात्रीनंतर ही आग लागली. हा नाईट क्लब राज्याची राजधानी पणजीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्पोरा येथे आहे.










































