मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांचा दस्तऐवजी आढावा घेणारे “विकास प्रदर्शन”

0
1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळावरील विशेष प्रदर्शन

दि.०४(पीसीबी) – महाराष्ट्र राज्यातील पहिलेच असे मुख्यमंत्री ज्यांच्या १ वर्षपुर्तीची संकल्पना यशस्वीपणे पिंपरी चिंचवड , पुणे येथे राबविण्यात येत आहे. “आपला आदर्श, आपली प्रेरणा, नवमहाराष्ट्र निर्माण संकल्पना” या वाक्यप्रमाणे कार्य करणारे सर्वस्पर्शी मुख्यमंत्री “विकास प्रदर्शन” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याच्या वर्षपूर्ती निमित्त, “लोकशाहीचा चौथा स्तंभ” नामांकित वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचे छायाचित्र प्रदर्शन चिंचवड येथे आयोजन केले आहे.

स्टेप्स फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्राचे प्रभावशाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील विकासकामांचा सर्वांगीण आढावा सादर करणारे विशेष “विकास प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन राज्यातील विविध विभागांत राबविण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा, निर्णयांचा आणि जनकल्याणकारी उपक्रमांचा दस्तऐवजी स्वरूपात व्यापक परिचय करून देणार आहे. शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत , प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालन चिंचवड येथे संपन्न होणार आहे. हे प्रदर्शन सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोफत पाहण्यासाठी खुले राहणार आहे. याचा माहितीपर आनंद सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रदर्शन मुख्य संयोजक श्री.नितीन चिलवंत, स्टेप्स फाउंडेशनचे प्रा. संदेश मुखेडकर यांनी केले आहे.


: प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये :
* कार्यालयीन सुधारणा १०० दिवस सात कलमी कार्यक्रम
* सर्वस्पर्शी मुख्यमंत्री : महाराष्ट्र हितासाठी १२५ महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती
* भव्य शपथविधी : आझाद मैदानावरील भव्यदिव्य शपथविधी
* विधिमंडळाचे विशेष अधिवेशन
* महाराष्ट्र राज्याचे नवे कारभारी! नवे मंत्रिमंडळ
* महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र विधानसभा वेळी आयोजित विशाल सभेचे नेतृत्व
* महाविजय राज्य अधिवेशन शिर्डी, अहिल्यानगर
* दावोस मध्ये घडवलेला इतिहास
* मंत्रिमंडळ निर्णय एक दृष्टिक्षेप
* विकसित महाराष्ट्र २०४७ : विकास आराखडा, १५० दिवस मोहीम महाराष्ट्र शासन
* फोटोबायोग्रफी २०२४/२५ : आसमंतात दुमदुमतो कीर्तीचा सुगंध
* महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५
* बालचित्रकार कु. शोर्य नितीन चिलवंत यांनी रेखाटलेले पेन्सिल स्केच
* महाराष्ट्र शासनाचे एका वर्षातील जीआर : एक दृष्टिक्षेप
* कर्तव्यपथ : ऐतिहासिक कार्याचा नवोदित संकल्पना वास्तवात रुपांतरित करण्याचा माहिती आढावा

अशा प्रकारे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक वर्षपूर्ती कार्याचा आढावा म्हणून प्रभावशाली कामांचा नामांकित वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजन केले आहे.
आयोजकांनी सांगितल्या प्रमाणे या प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे राज्य शासनाने राबविलेल्या विविध विकासकामांची व उपक्रमांची निष्पक्ष, सुस्पष्ट आणि संपूर्ण आढावा घेणारी माहिती जनतेसमोर मांडणे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेले लोककल्याणकारी निर्णय, गतीमान झालेली प्रकल्प अंमलबजावणी व प्रशासनातील पारदर्शकता यांचे सादरीकरण हाच या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. असे आयोजक स्टेप्स फाउंडेशनचे प्रा. संदेश मुखेडकर आणि प्रदर्शन मुख्य संयोजक श्री.नितीन चिलवंत यांनी सांगितले. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून

विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, कॅप्टन आशिष दामले ( अध्यक्ष : परशुराम विकास महामंडळ, राज्यमंत्री दर्जा ), राजेश पांडे ( महामंत्री: भाजप, मुख्य आयोजक पुणे पुस्तक महोत्सव ), श्रीरंग बारणे ( खासदार ), डॉ. अजित गोपछेडे ( खासदार, राज्यसभा ), प्रा. मेधाताई कुलकर्णी ,( खासदार, राज्यसभा ), उमाताई खापरे ( आमदार, विधान परिषद ), अमित गोरखे ( आमदार, विधान परिषद ), महेशदादा लांडगे ( आमदार, विधानसभा ), शंकरभाऊ जगताप ( आमदार, विधानसभा ), सुनीलअण्णा शेळके ( आमदार, विधानसभा ),  शत्रुघ्न बापू काटे ( शहराध्यक्ष: भाजपा, पिंपरी चिंचवड ), धीरज घाटे ( शहराध्यक्ष: भाजप, पुणे ), गजानन जोशी ( मुख्य समन्वयक, देवभाऊ फाउंडेशन ), ऍड. गोरक्ष लोखंडे ( सदस्य : अनुसूचित जाती आयोग ( सचिव दर्जा ) यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.