
दि.०१(पीसीबी)-श्रीलंकेवर हिटवाह चक्रीवादळाने मोठा कहर केला, तब्बल 200 लोकांचा जीव गेला आहे. भारताच्या दिशेने या वादळाची वाटचाल सुरू असून, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे.भारतीय प्रशासनाने आधीच अलर्ट जारी केला असून, हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताने ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू केले असून, मदत व बचाव पथके श्रीलंकेमध्ये तैनात करण्यात आली आहेत. स्थानिक प्रशासनाने किनाऱ्यावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.हिटवाह चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून, काही भागात पावसाची शक्यता आहे. आज १ डिसेंबरपासून वाऱ्याचा वेग २० ते २५ किलोमीटर प्रती तास पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमानात घट होत असून, हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोमवारपासून वायव्येकडील वाऱ्यांचा वेग वाढेल आणि थंडीचा प्रभाव तीव्र होईल.
महाराष्ट्रासह किनारपट्टीवर सर्व प्रशासन सतर्क असून, समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा पथके आणि बचाव यंत्रणा तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांनी जागृती ठेवावी आणि हवामान खात्याच्या सूचना पाळाव्यात, अशी शिफारस करण्यात येत आहे.










































