दि.०१(पीसीबी)-महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि गैरव्यवहार उघड झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मुंबईत तब्बल ११ लाख १ हजारांहून अधिक डुप्लिकेट नावे आढळली आहेत, तर नांदेड-वाघाळा महापालिकेत तर अनोखीच परिस्थिती मतदार थेट कोचिंग क्लासमध्ये ‘राहत’ असल्याची नोंद झाली आहे.
मुंबईतील एकूण १.०३ कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी १०.६४% नावे डुप्लिकेट आहेत. म्हणजेच सुमारे ११ लाख १ हजार नावं मतदारयादीत पुन्हा पुन्हा दिसत आहेत.यातील सर्वात गंभीर प्रकरण म्हणजे एका व्यक्तीचं नाव तब्बल १०३ वेळा नोंदवलेलं आहे अधिकाऱ्यांच्या मते, छपाईतील चुका, स्थलांतर व मृत व्यक्तींची नावं न काढल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. विशेष म्हणजे ज्या प्रभागात ही चूक मोठ्या प्रमाणात आढळली, ते प्रभाग याआधी शिवसेना (उबाठा )आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या ताब्यात होते.वर्लीचा प्रभाग १९९ हा सर्वात जास्त प्रभावित येथे ८,२०७ डुप्लिकेट मतदार नोंदले गेले आहेत.या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने (SEC) हरकती नोंदवण्याची मुदत २७ नोव्हेंबरवरून ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यामुळे निवडणुका फेब्रुवारीत ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
IIB चे MD दशरथ पाटील यांनी सांगितलं की हे विद्यार्थी इथे राहतही नाहीत; एका कालावधीत अधिकाधिक मतदार नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दडपणाखाली अधिकारी या चुका घडल्याची कबुली देत आहेत.या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी याला “अक्षम्य आणि अत्यंत गंभीर” म्हटलं असून, अशा यादीवर निवडणुका झाल्या तर त्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील, अशी चेतावणी दिली.चुकीच्या प्रभागात मतदारांची मनमानी हालचाल केल्यास निकालांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा त्यांचा आरोप आहे.










































