दि.२७(पीसीबी) -चिंचवड विधानसभा मतदारसंघ (क्र.२०५) मध्ये शिरूर, वडगाव शेरी, खडकवासला, पर्वती आणि हडपसर अशी पाच विधानसभा मतदारसंघांतील तब्बल ५४ हजार ६६० नावे समाविष्ठ केल्याची मोठी लेखी हरकत माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या यादीत अन्य विधानसभा निहाय ज्या मतदारांची नावे आहेत ती संख्या अशी आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघ १० हजार २३०, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ ११ हजार ०६४, खडकवासला विधानसभा मतदारसंघ १२ हजार ३३०, पर्वती विधानसभा मतदारसंघ ८ हजार २३८, हडपसर विधानसभा मतदारसंघ १२ हजार ७९८. सर्व पाच विधानसभा मतदारसंघांमधून चिंचवड विधानसभेत समाविष्ट केलेल्या मतदारांची एकूण संख्या : ५४ हजार ६६० आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकत
२० नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीचा सखोल अभ्यास केला असता, अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या आहेत.विशेष म्हणजे, याच प्रकारच्या अनियमितता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२५ मधील चिंचवड विधानसभा मतदार यादीतही आमच्या निदर्शनास आल्या होत्या.
या अनुषंगाने, आम्ही नोंदवित असलेल्या आक्षेपांची सविस्तर आकडेवारी पुढील प्रमाणे आहे:
विधानसभा निवडणूक काळात ३१ ऑगस्ट २०२४ ते १ ऑक्टोबर २०२४ या अवघ्या एका महिन्यात झालेली संशयास्पद मतदारवाढ ही २४ हजार ५५ आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक २५ (वाकड) मध्ये समाविष्ट झालेले मतदान हे ४ हजार ७३४ आहे. अल्प कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेले मतदान संशयास्पद आहे. ही वाढ प्रभाग क्रमांक २५ मध्ये थेट प्रतिबिंबित होत असल्याने, सदर मतदारांचे ऑनलाईन व फील्ड व्हेरिफिकेशन करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी कलाटे यांनी केली आहे.
चिंचवड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये समान EPIC क्रमांक असलेले पुनरावृत्तीतील मतदार एकूण मतदार संख्या : ६ हजार ३९० आहेत. अनेक मतदारांचे EPIC क्रमांक एक सारखे असून ते दोन किंवा तीन वेळा यादीत आढळतात, अशा सर्व पुनरावृत्त मतदारांची चाचणीकरून, ते कोणत्याही प्रभागात असले तरी ही मतदार यादीतून वगळण्यात यावे अशी सुचना कलाटे यांनी केली आहे.
लोकसभा २०२४ नंतर विधानसभा २०२४ च्या मतदार यादीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वगळलेली नावे ही ९ हजार ३०२ आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात नावे वगळण्याबाबतही शंका निर्माण होते. म्हणूनच, संबंधित सर्व नोंदींची सखोल फेरडताळणी करून चुकीने वगळलेली नावे असल्यास ती तातडीने पुनर्स्थापित करण्यात यावीत, असेही कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघत इतर विधानसभा मतदारसंघांतील समाविष्ट मतदारांची संख्या
शिरूर विधानसभा मतदारसंघ : १०,२३०
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ : ११,०६४
खडकवासला विधानसभा मतदारसंघ : १२,३३०
पर्वती विधान सभा मतदारसंघ : ८,२३८
हडपसर विधान सभा मतदारसंघ : १२७९८
इतर मतदारसंघांमधून चिंचवड विधानसभेत समाविष्ट केलेल्या मतदारांची एकूण संख्या : ५४६६०
वरील मतदारांचा तपशील संलग्न केला आहे. आपण चिंचवड तसेच संबंधित मतदारसंघांमध्ये ऑनलाइन आणि फील्ड पातळीवर सखोल पडताळणी करून मतदारांची स्थिती तपासावी. त्यानुसार आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करून दुबार नोंदी वगैर प्रकार तत्काळ हटवाव्यात, ही विनंती.
५) चिंचवड विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदार संघांतर्गत असलेले एकूण दुबार मतदान: ९७७०
या सर्व मतदारांचा स्पॉट पंचनामा करण्यात यावा. तपासणी नंतर सिद्ध होणारे डुप्लिकेट मतदान तात्काळ मतदार यादीतून वगळण्यात यावे.
६) प्रभाग क्रमांक २५ मधील सध्या आढळणारे दुबार मतदार
एकूण दुबार मतदार : २,०७६
ही संख्या अत्यंत मोठी असून, यासर्व मतदारांचा स्पॉट पंचनामा करण्यात यावा. तपासणीनंतर सिद्ध होणारे डुप्लिकेट मतदान तात्काळ मतदार यादीतून वगळण्यात यावे.
७) विधानसभा २०२४ मध्ये ‘Deleted’ म्हणून वगळलेले मतदारांपैकी पुन्हा फक्त प्रभाग २५ मध्ये समाविष्ट अशी प्रकरणे : १०६
विधानसभा निवडणुकीत ‘Deleted’ शिक्का असलेल्या मतदारांना महानगरपालिका प्रारूप यादीत पुन्हा समाविष्ट करण्यात आल्याची नोंद आहे. ही गंभीर अनियमितता असून, याबाबत स्पष्ट स्पष्टीकरण देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.
८) प्रभाग क्रमांक २५ च्या मूळ रहिवाशांची नावे प्रभाग क्रमांक २६ मध्ये स्थानांतरित करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक २५ मधील प्रभावित परिसर :
वाकड गावठाण
दत्त मंदिर रस्ता
सुदर्शन कॉलनी १ ते ६
सद्गुरु कॉलनी १ ते २
काळाखडक परिसर
वरील परिसरातील मूळ रहिवाशांची नावे चुकीच्या पद्धतीने प्रभाग क्रमांक २६ मध्ये स्थानांतरित करण्यात आली आहेत. संबंधित मतदारांनी त्यावर अधिकृत हरकती देखील दाखल केल्या आहेत. कृपयाही नावे त्यांच्या मूळप्रभाग (२५) मध्ये पुनर्स्थापित करण्यात यावीत.
दस्तऐवज सादर
वरील सर्व हरकतींचे पुरावे आम्ही हार्डकॉपी आणि सॉफ्ट कॉपी या दोन्ही स्वरूपात आपल्या कार्यालयात सुपूर्द करत आहोत. कृपया सदर हरकतींवर त्वरित व आवश्यक ती कार्यवाही करून सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करावी













































