प्रारूप मतदार यादीतील गोंधळावर भाजपचा पाठपुरावा रंगला; हरकतीसाठी मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय

0
4

दि.२७(पीसीबी)-चिंचवड शहरातील प्रारूप मतदार यादीत झालेल्या त्रुटी, चुकीची स्थलांतरे, आणि माहिती अभावामुळे नागरिकांत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मंगळवारी म्हणजे कालच राज्य निवडणूक आयोगाला लेखी निवेदन देत हरकती दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत वाढवावी, अशी ठाम मागणी केली होती.

या मागणीची राज्य निवडणूक आयोगाने सकारात्मक दखल घेत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला असून, हरकती दाखल करण्याची मुदत आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, “लोकशाहीतील सर्वात मोठी ताकद म्हणजे मतदार. मतदार यादीतील गोंधळामुळे एकाही नागरिकाचा मतदानाचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी आम्ही निवेदन दिले होते. आयोगाने या निवेदनाची सकारात्मक दखल घेत मुदतवाढ दिली, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा उपयोग करून आपल्या हरकती वेळेत नोंदवाव्यात, ही विनंती.”

शहरातील अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात स्थलांतरित होणे, यादीत गंभीर चूक असणे आणि माहिती सुलभरीत्या पाहण्यासाठी यंत्रणा नसणे—या साऱ्या कारणांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजप शहराध्यक्षांच्या पुढाकाराने झालेल्या या पाठपुराव्यामुळे शहरातील मतदारांना अतिरिक्त वेळ मिळणे हे लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी मोठे पाऊल ठरत असल्याची भावना व्यक्त होत