पुणे शहरात चाललंय काय… चक्क महिलेचा पुरुषावर अत्याचार

0
1

मूळचा कोल्हापूरचा असलेल्या या तरुणाच्या घरी जाऊनही आरोपी महिलेने जबरदस्तीचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर वाराणसी येथेही त्याला जबरदस्तीने नेऊन तिथेही त्याच्यावर दबाव टाकला आहे.

पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात नक्की कधी काय घडेल याचा नेम राहिला नाही. अशातच पुण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका तरुणाला गुंगी आणणारे औषध पाजून त्याच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेविरोधात करण्यात आला आहे. पीडित तरुणाने कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल करताच या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिला स्वत:ला वकील असल्याचा आव आणत होती. कायद्याची भीती दाखवत ती तरुणाला वारंवार धमकावत होती. गुंगीच्या अवस्थेत त्याच्यावर अत्याचार करण्यात आळा. याचवेळेस अत्याचार करणाऱ्या महिलेने तरुणाचे काही खाजगी फोटो काढून ठेवले होते. पुढे तेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत त्याच्याकडून पैशांची मागणी केली जात होती. सततच्या मानसिक छळामुळे गेल्या काही दिवसांपासून तरुण प्रचंड तणावात होता.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, अत्याचाराची ही मालिका फक्त पुण्यातच थांबली नाही तर मूळचा कोल्हापूरचा असलेल्या या तरुणाच्या घरी जाऊनही आरोपी महिलेने जबरदस्तीचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर वाराणसी येथेही त्याला जबरदस्तीने नेऊन तिथेही त्याच्यावर दबाव टाकल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप अधिकच गंभीर झाले आहे.

अश्लील फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत आरोपी महिला तरुणाकडून सतत आर्थिक मागण्या करत होती. बदनामीची भीती आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धाकाने पीडित शांत बसलेला असला तरी अखेरीस त्याने धैर्य एकवटत कोथरूड पोलिसांकडे धाव घेतली.

फिर्याद घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुंगीचे औषध देणे, जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करणे, खाजगी फोटो काढून ब्लॅकमेल करणे, धमक्या देणे अशा अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचे सखोल तपास सुरू आहे.