दि.२६(पीसीबी)-नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका लागलेल्या असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मतभेद समोर आले आहेत. निवडणूक काळात हा वाद चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये अंतर वाढलं आहे. “महापालिकेच्या नियोजनासाठी ज्या बैठका घेतल्या जातात, त्या बैठकांमधून मला डावललं जातय” असा गंभीर आरोप राजेंद्र जंजाळ यांनी मंत्री, आमदार संजय शिरसाट यांच्यावर केला आहे. राजेंद्र जंजाळ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. “एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि सुरतला गेले होते. आम्हाला माहीत नव्हते की ते कोणत्या पदावर राहतील. परंतु आम्ही तेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. एकनाथ शिंदे यांनी मला जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आणि मी चांगलं काम केलं. पक्षाला यश मिळालं” असं राजेंद्र जंजाळ यांनी सांगितलं.
“जे कार्यकर्ते शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी सुरुवातीपासून काम करतात, त्यांनाही संजय शिरसाट यांच्याकडून डावलले जाते.शिवसेना कार्यकर्त्यामध्ये खदखद आहे. कोणी बोलायची हिंमत करत नाही, परंतु मी बोलण्याची हिंमत केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आणि शिरसाट यांची जी वागण्याची पद्धत आहे, ती नक्कीच पक्षाला बुडवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे” असं राजेंद्र जंजाळ म्हणाले.
“नंदकुमार घोडेले जे महापौर आहेत, ते नेहमी संजय शिरसाट यांच्यासोबत दिसतात. त्यामुळे जंजाळ म्हणाले की, जागा कोणी घेतली हे महत्त्वाचं नाही तर, जागा घेणारा माणूस त्या लायकीचा आहे का? हे बघितलं पाहिजे. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची बायको मागच्या निवडणुकीत पडली होती. जेव्हा संजय शिरसाट यांची निवडणूक होती तेव्हा तुम्हाला सर्वजण पाहिजे होते, आज तुमचे काम झाले म्हणून आम्ही तुम्हाला नको वाटत आहोत. हे कुठेतरी चुकीच आहे. त्यामुळे नुकसान पक्षाचे आणि कार्यकर्त्यांच होणार आहे” असं राजेंद्र जंजाळ टीका करताना म्हणाले.
“संजय शिरसाट ज्या पद्धतीने वागत आहेत, त्या संदर्भात मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी बोलणार आहे. स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करू नका ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्या शिकवणीनुसार वागण्याचा प्रयत्न मी केला आहे. राजकारण माझा व्यवसाय नाही आणि राजकारणामुळे माझे घरही चालत नाही. राजकारण माझा छंद आहे. स्वाभिमान गहाण ठेवून ज्या दिवशी मला राजकारण करावे लागेल, त्या दिवशी मी राजकारण सोडून देईन” असं राजेंद्र जंजाळ म्हणाले.
त्यावेळेस कार्यकर्ते पक्ष सोडून जातात
“ज्यावेळी पक्षांमध्ये अन्याय होतो असे वाटते, त्यावेळेस कार्यकर्ते पक्ष सोडून जातात. राजेंद्र जंजाळ यांचे शिरसाट यांना आव्हान, त्यांनी समोरासमोर चर्चा करून माझे जे काही आरोप आहेत ते खोडून काढावे. संजय शिरसाट यांनी कोणाला घेऊन बसावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु पक्ष संघटना म्हणून पक्षाच्या बैठकांना शिवसेना जिल्हाप्रमुख असलाच पाहिजे हा अलिखित नियम आहे” असं राजेंद्र जंजाळ यांनी म्हटल











































