बिहार विधानसभा निवडणुकीतील NDA च्या विजयाचा पिंपरी-चिंचवडमध्ये दणक्यात जल्लोष!

0
4

पिंपरी: नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) दणदणीत विजय मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टी (BJP) पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने आज, शुक्रवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला.

शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी, पिंपरी (पुणे -१८) येथे हा जल्लोष सोहळा पार पडला. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, घोषणा देत आणि फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केला. संपूर्ण परिसर भाजपच्या झेंड्यांनी आणि उत्साहाच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या आणि केंद्र तसेच बिहारमधील नेतृत्वाचे अभिनंदन केले. बिहारमधील या विजयामुळे देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर जनतेने विश्वास दर्शवल्याची भावना यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी यावेळी बोलताना, “बिहारमधील हा विजय जनतेचा विजय आहे. हा विजय भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि सर्वांचा साथ, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास या मंत्रावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. या विजयाचा उत्साह पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये संचारला आहे. या यशाबद्दल आम्ही केंद्रीय नेतृत्वाचे आणि बिहारमधील सर्व मतदारांचे आभार मानतो,” असे सांगितले.

हा जल्लोष केवळ बिहारच्या विजयाचा नसून, आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहरात भाजप अधिक मजबूत करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे,आ.उमाताई खापरे,प्रदेश सदस्य सदाशिव खाडे,जिल्हा संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, वैशाली खाडये, मधुकर बच्चे,युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, माजी नगरसेवक नामदेव ढाके, राजू दुर्गे, केशव घोळवे, शारदा सोनवणे, शैलेश मोरे, शीतल शिंदे, विजय फुगे, मनोज ब्राह्मणकर,अॅड. सत्यनारायण चांडक, अजित कुलथे,जयंत उर्फ आप्पा बागल, मंडल अध्यक्ष मोहन राऊत, सनी बारणे, गणेश ढोरे, हर्षद नढे,मंगेश धाडगे,जयदीप खापरे,अनिता वाळूंजकर, राज तापकीर,खंडू कथोरे,अजित भालेराव, कैलास सानप,प्रदिप बेंद्रे,समीर जावळकर, राजाभाऊ मासुळकर,सुभाष पाठक,वीणा सोनवलकर,नरेश पंजाबी,गणेश ढाकणे,नेताजी शिंदे,गोरख कुंभार,जयेश चौधरी,हेमराज काळे, अभिजीत बोरसे,सतीश नागरगोजे,रवींद्र प्रभुणे, प्रीती कामतीकर,सुधीर चव्हाण, चैतन्य देशपांडे,सीमा बोरसे, उत्तम दणाने,नंदकुमार दाभाडे,भूषण जोशी,रणजीता इनामदार,मनीषा अनारसे, संजय परळीकर इ. तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.