बिहारच्या जनतेने एनडीएला कौल दिला की महागठबंधनला?

0
2

दि,१२(पीसीबी)-बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला , तर ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. बिहारच्या जनतेने एनडीएला कौल दिला की महागठबंधनला? की जन सुराज्य पक्षाला? हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी मतदान पूर्ण झाल्यानंतर संभाव्य निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. बहुतेक सर्वच्या सर्व सहा एक्सिट पोल हे एनडीए च्या पथ्यावर पडणारे आहेत.

मतदानाआधी जाहीर झालेल्या ओपिनियन पोल्समधून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोल्सची आकडेवारी देखील सारखीच आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सद्वारे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक भास्कर, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीची निवड केली आहे.

पीपल्स पल्सच्या एक्झिट पोल्सनुसार बिहारमध्ये एनडीएची सत्ता येईल

एनडीए : १३३ ते १५९

महागठबंधन : ७५ ते १०१

जनसुराज पक्ष : ० ते ५

इतर : २ ते ८

पीपल्स इन्साइट्स -एनडीएला बहुमत
एनडीए : १३३ ते १४८

महागठबंधन : ८७ ते १०२

जनसुराज पक्ष : ० ते २

इतर : ३ ते ६