सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान झालं. या कठीण परिस्थितीत पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी ‘इंडो ऍथलेटिक्स सोसायटी’ या क्रीडा व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आलं. या आवाहनाला पुणे, पिंपरी चिंचवड व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागरिकांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबांसाठी धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहेत. या किटमध्ये संसारोपयोगी साहित्य, तीन महिन्यांसाठी पुरेलं इतकं धान्य, साड्या, अंथरूण, तसेच मुलांसाठी रिअल ज्यूस आणि संपूर्ण शालेय साहित्य यांचा समावेश आहे.
शनिवारी दिनांक आठ नोव्हेंबर रोजी दिवसभरात ही मदत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीच्या काठावरील तांदूळवाडी मोठ्या ग्रामपंचायत मध्ये 350 पूरग्रस्त कुटुंबांची इंडो अथलेटिक सोसायटीच्या सदस्य तर्फे निवड करण्यात आली आणि त्यांना मदत पोहोचवण्यात आली.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली येथे देखील पूरग्रस्त बांधवांना इंडो ऍथलेटिक्स सोसायटीतर्फे साधारणता एक हजार कुटुंबांना अशीच मदत करण्यात आली होती. संस्थेचे सदस्य ॲड. गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, गिरीराज उमरीकर, मदन शिंदे यांच्यावर वितरणाची जबाबदारी होती तर नियोजनामध्ये मदन शिंदे, दिलीप शिंदे, अजित गोरे, दिनेश गुपचूप, श्रीकांत चौधरी, रमेश माने, सुशील मोरे, प्रदीपजी टाके, संतोष नखाते, मंदार शेंडे, अविनाश चौगुले, मारुती विधाते, सुनील चाको, कैलास शेट तापकीर, मधुरा खाडीलकर, तुषार देशमुख आदींचा समावेश होता.















































