“झोपडपट्टीतील कार्यकर्त्याच्या घरात ‘दादा’ — पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नवा आदर्श”
चंद्रकांत दादांच्या दौऱ्याने शहरात उत्साहाचं वातावरण, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचा हा दौरा नियोजित केला होता. चिंचवड आणि पिंपरी विधानसभा दौरा पूर्ण झाला असून लवकरच भोसरी विधानसभा दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्याने शहरात विकासाचा आणि उत्साहाचा नवा संदेश दिला आहे.
शहरातील नागरी प्रश्न, विकासकामे आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली.
या बैठकीस मा.चंद्रकांतदादा पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि आरोग्य विभागातील अडचणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या वेळी श्री चंद्रकांत दादांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “पिंपरी चिंचवड शहर हे झपाट्याने वाढणारे औद्योगिक केंद्र आहे. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांच्या उन्नतीसाठी प्रशासनाने ठोस आणि वेळबद्ध पावले उचलावीत,” असे त्यांनी नमूद केले.
श्री महेश दादा लांडगे, श्री शंकर शेठ जगताप, श्री अमित गोरखे आणि श्री उमाताई खापरे या शहरातील चारही आमदारांनी शहरातील विविध प्रलंभीत प्रश्नाकडे चंद्रकांत दादा यांचे लक्ष वेधले आणि दादांनीही याबाबत नाराजी व्यक्त करीत पालिका प्रशासनाला फैलावर घेतले आणि आपली सकारात्मक भूमिका मांडत प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मिनिस्टर झोपडपट्टीतील एखादा कार्यकर्त्याच्या निवासस्थानी गेला आणि त्याच्याशी व त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत सर्वासामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेतले. हे चित्र सामान्य एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात नवी चेतना व ऊर्जा निर्माण करणारे ठरले.
बैठकीत भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांनी शहरातील अनियमित पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेतील समस्या मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
“हे प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहेत. प्रशासनाने समन्वयाने काम करून तातडीने तोडगा काढावा,” असे त्यांनी सांगितले.
या दौऱ्यादरम्यान श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी आपले प्रश्न प्रत्यक्ष मांडले, तर दादांनी संयमी व संवादशील नेतृत्वातून सकारात्मक दृष्टीकोन मांडत सर्वांचा विश्वास संपादन केला.
दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नागरिकांत आत्मीयता आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात हा दौरा विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत नागरिक व कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे,आमदार श्री महेशदादा लांडगे,आमदार श्री शंकरशेठ जगताप,आमदार श्री अमित गोरखे,आमदार सौ.उमाताई खापरे, मा.खासदार श्री अमरजी साबळे,माजी आमदार सौ.अश्विनीताई जगताप, प्राधिकरण मा.अध्यक्ष श्री सदाशिव खाडे,संगठन सरचिटणीस श्री मोरेश्वर शेडगे,श्री मधुकर बच्चे,डॉ संजीवनी पांडे, सौ वैशाली खाडेय,श्री राजू दुर्गे,श्री तुषार हिंगे,श्री केशव घोळवे,श्री शैलेश मोरे,सौ योगिता नागरगोजे,श्री कुणाल लांडगे,श्री कैलास कुटे,श्री मंगेश धाडगे,श्री धरम वाघमारे,श्री जयदीप खापरे,सौ अनिता वाळुंजकर,श्री गणेश लंगोटे,श्री सुनील कदम, महेंद्र बाविस्कर तसेच त्या त्या परिसरातील नगरसेवक, विविध विभाग प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.















































