जमीन प्रकरणाचे फक्त निमित्त, अजितदादा हेच भाजपचे लक्ष्य

0
9

दि.०७(पीसीबी)-पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार याचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह आतापर्यंत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र हे करताना पोलिसांनी अजब प्रकार केलाय. अमेडिया कंपनीत 99 टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. तर केवळ एक टक्का भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमधील कारवाई पाहता अजित पवारांची कोंडी त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून करण्याचा प्रयत्न होतोय का आणि याला येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.

अजित पवारांचा स्वभाव हा समोरच्याला डॉमिनेट करण्याचा आहे काँग्रेस सोबत पंधरा वर्षे सत्तेत राहूनच राष्ट्रवादी काँग्रेसने हातपाय पसरले आणि आघाडीमध्ये मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे खच्चीकरण करताच राष्ट्रवादी काँग्रेस वाढली आधी पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता काँग्रेसकडून राष्ट्रवादीने खेचून घेतली. त्यानंतर पुणे महापालिकेतील काँग्रेसची सत्ता देखील अजित पवारांनी कलमाडींकडून खेचून घेतली. त्याचबरोबर पुण्याची जिल्हा परिषद देखील राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे घेतली. राज्यात इतर अनेक ठिकाणी सत्तेत मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसचं खच्चीकरण करताच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वाढला. विस्तारला मात्र भारतीय जनता पक्ष सोबत सत्तेत असताना या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना सत्तेचा नेमका उलट अनुभव यायला लागलाय.

गेलं काही दिवसांमधली आपण काही उदाहरणं जर नजरेसमोर ठेवली सगळ्यात आधी सोलापूर जिल्ह्यातले अजित पवारांच्या पक्षात असलेले जे माजी आमदार आहे. ते भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे खेचले. ज्यामध्ये राजन पाटील आहेत ज्यामध्ये बबनदादा शिंदे आहेत. हे असे आमदार की जे पूर्वपार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवारांना भारतीय जनता पक्षाने सलोखा करण्यासाठी बाद केला. अजित पवार गेली काही दशक या ऑलम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी आहेत. सचिव आणि इतर सगळी पद अजित पवारांच्या मर्जीनी त्या ठिकाणी ठरवली जातात. मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. त्यानंतर अजित पवारांची विश्वासू असलेले नामदेव शिरगावकर यांच्यावर पुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांना अटकीची भीती दाखवण्यात आली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची पद स्वतःच्या ताब्यात घेण्याची मोहीम व्यवस्थितपणे राबवली आणि अजित पवार हजबळपणे या सगळ्याला तयार झाले. त्यानंतर पार्थ पवारांचं सध्या चर्चेत असलेलं जमीन घोटाळ्याचं कथित घोटाळ्याचे प्रकरण पुण्यातील मुंढवा भागामध्ये जे बॉटनिकल गार्डन आहे त्या ठिकाणी खरंतर शेकडो वर्षांपासून हे गार्डन आहे तिथे झाड काहीशे वर्षांपासूनचे आहेत ब्रिटिश काळापासून त्या भागामध्ये जमिनी वतन म्हणून देण्याची प्रथा आहे.

सदर ठिकाणी असलेल्या महार वतनाच्या जागेवरतीच हे बोटॅनिकल गार्डन उभा करण्यात आलं. त्यासाठी 99 वर्षांच्या कराराने या वतनदारांनी जागा बॉटनिकल गार्डनसाठी देण्याचं दाखवण्यात आलं आणि पुढे स्वातंत्र्यानंतर देखील हे जे काही आहे. ठरलेलं बोटॅनिकल गार्डनला जागा देणे तसेच सुरू राहिलं. मात्र पार्थ पवारांना या जागेवरती आयटी पार्क उभा करायचं होतं. दरम्यानच्या काळात ज्या महार समाजातील लोकांच्या नावावरती या वतनाच्या जमिनी होत्या. एकूण 48 एकरांचा हा बॉटनिकल गार्डनचा परिसर आहे त्यातील काही लोकांकडून या जमिनी तेजनानी नावाच्या एका व्यक्तीने व्यक्तीच्या महिलेने पॉवर ऑफ एटरनी करून त्यावेळी खरेदी केल्याचं सांगितलं जातं. त्या बदल्यात काही रक्कम देखील दिल्याचे सांगितलं जातं. मात्र पावर ऑफ ऑटोर मी घेतल्यानंतर त्या महिलेने पुढची काही वर्ष काहीच केलेले नाही.

साधारणपणे 2006 च्या दरम्यानची आहे, ती करण्यात आल्याचे सांगण्यात येतं आणि त्यानंतर त्या महिलेनी मिळवलेले अधिकार पॉवर ऑपरेटरणीच्या माध्यमातून ती जागा एका कंपनीला आणि एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला आणि त्यानंतर त्या जागेवरती एक आयटी पार्क करण्याचा जो इरादा आहे. जो आराखडा आहे तो पार्थ पवार यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे ठेवला आणि त्याला तात्काळ परवानग्या या प्रशासनाकडून मिळत गेल्या. पुण्याच्या प्रशासनाकडून मिळाल्या कारण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि गेली अनेक वर्ष पुण्यावरती त्यांची एक हाती पकड राहिली आहे. राहिले आता ती पकड आहे का आता ती उरली आहे का? हा प्रश्न सध्या या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण आपण पाहिलं पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण माध्यमांमध्ये आलं. मुंबईतून आणलं गेलं आणि त्यानंतर अतिशय वेगाने या कारवाईची पाऊल उचलली गेली.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं सांगितलं. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळेच अजित पवारांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतोय का? हा प्रश्न विचारला जातोय. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं पुण्यातील जैन बोर्डींगच्या जमिनीच्या गतीत घोटाळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. मोठ्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांना समोर जावं लागलं आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुण्याचा भाजपचे नेतृत्व मुरलीधर मोहोळ करणार आहे. भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी हा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच आहे.

मग ती पुणे महापालिकेची निवडणूक असो पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका 2017 मध्ये भारतीय जनता पक्षांनी जिंकल्याच आणि आता जिल्हा परिषद हे भाजपचं पुढचं लक्ष आहे. त्यासाठी भोरचे संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार आणि पुरंदरचे संजय जगताप काँग्रेसचे माजी आमदार भाजपने स्वतःच्या पक्षात घेतले आणि आता अजित पवारांच्या या अशा कोंडी करण्यातून भारतीय जनता पक्षांनी आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केलाय. भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष असतात. मग ठाकरेंची शिवसेना असो किंवा इतर राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष असोत भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणाचा अनुभव वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी घेतला आहे. अजित पवार आता तो अनुभव घेत आहेत.