पिंपरी, दि. 6: रंगभूमी दिनानिमित आयोजित चिंचवडला कलाकार कट्टा बुधवारी (दि ५) सुरु झाला. काव्य, पोवाडा, लोकगीते आणि अनुभव कथन झाले. त्यातून मनोरंजनाबरोबरच बोध आणि सामाजिक भान आणि प्रबोधनही केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथील पं. पद्माकर कुलकर्णी कलामंदिर येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिनानिमित्त येथे कलाकार कट्टा उपक्रम सुरु झाला आहे. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उद्घाटन जेष्ठ रंगकर्मी मधु जोशी, मसापचे अध्यक्ष राजन लाखे, शाहिरी परिषद अध्यक्ष प्रकाश ढवळे, कलाकार महासंघाचे उलपे आणि कलाकार, साहित्यिक, नाट्य, संगीत, लोककलावंत, नृत्य कलावंत आदी उपस्थित होते.
…
यांचा केला सन्मान
प्रसिद्ध नृत्य कलावंत गीता शर्मा, पत्रकार अविनाश चिलेकर, लोककलावंत फिरोज मुजावर, समीक्षक दीपक चैतन्य, कवयित्री माधुरी ओक, फॅशन डिझाईनर राजश्री धोंगडे यांचा रंगभूमी दिनानिमित्त सन्मान केला.
…..
आणि रंगला कट्टा
कविता, पोवाडा गाणी आणि अनुभव कथन झाले. गोविंद वाकडे यांनी ‘विस्कटून टीम राख माझ्या देहाची…’ ही कविता सादर केली. भाऊसाहेब भोईर यांनी कट्टा उपक्रमामागील मागील भूमिका सांगितली. ”जो तुमको हो पसंत वही बात कहेंगे…’ हे गाणे सादर केले. राजन लाखे यांनी ‘कविता काय सांगते’, हे सांगितले. तर प्रकाश ढवळे यांनी समाजातील विदारक स्थितीला आळा घालण्यासाठी जगण्यासाठी कला आवश्यक आहे. “हा महाराष्ट्र कसा आहे’ यावर पहाडी आवाजात पोवाडा सादर केला. संजय चांदगुडे यांनी “गर्जत पंढरपूर, सोन्याचा पिंपळ…” हे लोकगीत सादर केले. त्यास रसिकांनी रसिकांनी टाळ्यांची दाद दिली. सुहास घुमरे यांनी ”आयुष्यात एकदा तरी जखम होते…” ही कविता सादर केली. ज्येष्ठ रंगकर्मी मधु जोशी यांनी जगाची खरी भाषा संगीत आणि कला आहे. त्यामुळे कलाकार कट्टा व्यासपीठ देणारा आहे. कलेतून स्वानंद आणि प्रबोधन केले जाते. कलेचा आनंद घेऊ या. कविता सोपी नाही. कविता ऐका. दाद द्यायला हवी, अशी भावना व्यक्त केली. “कळले कळले, गुपित कळले, कोडे मज उलगडले….” ही कविता सादर केली. सुहास घुमरे यांनी कविता सादर केली. या कार्यक्रमात कविता, पोवाडा चित्रपट गीते सादर झाली. सुहास जोशी यांनी स्वागत केले. किरण येवलेकर यांनी आभार मानले.












































