सिमाताई सावळे यांच्यासाठी शुक्रवारी अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन

0
21

इंद्रायणीनगर, दि. ६ – पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील एक फर्ड्या वक्त्या, अभ्यासू व्यक्तिमत्व, रणरागिणी, महापालिकेतील बुलंद आवाज, गोरगरिब, वंचित, पिडीत आणि असंघटीत समाजाच्या कैवारी, जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन केले आहे. इंद्रायणीनगर, भोसरी येथील से. ७ द्वारका प्लॅटीनम शेजारील मोकळ्या मैदानात उद्या शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० दरम्यान सिमाताईंच्या हितचिंतकांनी हा अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
गेली पंचवीस वर्षे शहराच्या राजकारण, समाजकारणातील रोखठोख नेत्या म्हणून ख्याती असलेल्या सिमाताई सावळे यांनी आजवर तीन टर्म महापालिकेत सामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व केले आहे. शिवसेनेत असताना कायम मोर्चे, आंदोलने केल्या आणि स्वतःची एक प्रतिमा त्यांनी निर्माण केली. २०१७ मध्ये महापालिकेत भाजप सत्तेत आल्यावर प्रथम स्थायी समिती अध्यक्षा होण्याचा मान त्यांना मिळाला. आजवरची रेकॉर्डब्रेक कामे त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात केली. महापालिकेतील अनेक गैरव्यवहारांची प्रकरणे चव्हाट्यावर आणून करदात्यांचे कोट्यवधी रुपये त्यांनी वाचविले. सत्तेत असतानाही अनेक चुकिच्या कामांना विरोध करून ते हाणून पाडले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, रिपाईसह सर्वच राजकिय पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांशीही त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठीही त्यांचे नाव कायम चर्चेत राहिले.
आंबेडकरी चळवळीतील नेत्या म्हणून शहरातील सर्व झोपडिधारकांमध्ये सिमाताईंचा मोठा संपर्क आहे. घरगुती हिंसाचाराच्या प्रकऱणांतसुध्दा केवळ समुपदेशनातून त्यांनी शेकडो मुलिंचे संसार त्यांनी वाचविले. जिजाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम दिले. विदर्भातील बडनेरा या अमरावती जिल्ह्यातील मूळ गावीसुध्दा त्यांचे सामाजिक कार्य आहे.