सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करायच्या आहेत, परंतु विधीमंडळ अधिवेश काळात निवडणुकांची घोषण अशक्य असल्याने कदाचित महापालिकांच्या निवडणुका थेट मार्च २०२६ नंतर एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बातमीमुळे राज्यातील सर्व राजकीय पक्ष संभ्रमात पडले असून गेली चार वर्षे निवडणुकिच्या प्रतिक्षेत असेलेले कार्यकर्ते अक्षरशः वैतागले आहेत.
स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणुकांची घोषणा मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने केली. आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांनी पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपालिकांची निवडणूक २ डिसेंबर आणि मतमोजणी ३ डिसेंबरला होणार असे जाहीर केले. दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्यांची आणि तिसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांची निवडणूक होणार आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशन हे ८ ते १९ डिसेंबर दरम्याण होणार आहे. अधिवेशन काळात कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकिची घोषणा ही २१ डिसेंबरनंतर होईल. जानेवारीच्या शेवटच्या आटवड्यात या निवडणुकांसाठी मतदान आणि निकाल शक्य आहे. नंतर दहावी-बारावीच्या परिक्षांचा काळ सुरू होतो म्हणून थेट मार्च नंतर म्हणजे एप्रिल २०२६ मध्येच महापालिकांच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ देण्यासाठी मागणी करायचे ठरवले आहे, असे समजले.












































