महापालिका, जिल्हा परिषदेला विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे- अमित शहा

0
5

दि.२७ (पीसीबी)- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमातून ते बोलत होते.

अमित शाह म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन करतो. सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे. महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवीन सुरूवात करतोय. पक्षाची स्थापना झाल्यापासून छोटे मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना माहिती आहे की कार्यालय हे आपले मंदिर आहे. कार्यालयात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते. बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल. भाजपासाठी कार्यालय म्हणजे मंदिरच आहे.

आम्ही नेहमीच सिद्धांताच्या आधारे निती घडवली. भारत व भारतीय लोकांच्या हितासाठी कठोर संघर्ष केला. हे तिन्ही उद्देश ज्या ठिकाणी पूर्ती होते, ते ठिकाण म्हणजे भाजपचे कार्यालय आहे. मी सर्व माजी अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आता भाजप कुठल्या कुबड्यांचा आधार न घेता देखील चालते. भाजप आता स्वत:च्या बळावर उभे आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भाजप हे एक मजबूत स्वाक्षरी म्हणून दिसतेय, असे त्यांनी म्हटले.

अमित पुढे म्हणाले की, इमारत पाहून मी अभिनंदन करतो. 55 हजार चौरस फुटाचे हे कार्यालय आहे. लायब्ररी, कॉन्फरन्स रूम, प्रदेशाध्यक्षांसोबत इथे मुख्यमंत्र्यांचे देखील कार्यालय आहे. हे कार्यालय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देईल की येथूनच निवडून जायचे आहे. मला आनंद आहे की, महाराष्ट्र भाजपने आपल्या परंपरा लक्षात ठेवल्या आहेत. जनसंघानंतर भाजप निर्माण झाले, तेव्हा अटलजी बोलले होते की कमळ खिलेगा. तेव्हा पहिले पंतप्रधान अटलजी झाले. त्यानंतर 11 वर्षे मोदी जी पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान हे भाजपचे नेते झाले ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे, असे देखील त्यांनी म्हटले.

ज्या नेत्यांनी कठीण परिस्थितीत पक्ष मजबूत केला, पक्षाच्या विचारांचे बीज लावून त्याचे वटवृक्ष केले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना मी प्रणाम करतो. मला देखील अध्यक्ष होता आले. भारतात एकमेव भाजप हा पक्ष आहे, जिथे बुथ प्रमुख हा पक्षाचा, देशाचा अध्यक्ष होऊ शकतो. आमचा पक्ष घराणेशाहीनुसार चालत नाही. ज्याच्यात क्षमता आहे तोच या ठिकाणी मोठा नेता होता. आम्ही हे सिद्ध केले की, घराणेशाही या देशात चालणार नाही. तुम्हाला परफॉर्मन्स दाखवावाच लागेल, असे देखील अमित शाह म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात भाजपचे कार्यालय हवे

अमित शाह पुढे म्हणाले की, एका गरिब चहावाल्याचा मुलगा तीन वेळा पंतप्रधान होतो. लोकशाहीवादी पार्टीत आमचा विश्वास किती दृढ आहे? हे त्याचे उदाहरण आहे. ज्यांच्या पक्षात लोकशाहीवादी पद्धतीने निवड होत नाही, तिथे लोकशाहीचे रक्षण होऊ शकत नाही. डिसेंबर 2026 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात भाजपचे कार्यालय हवे, अशी विनंती मी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षां