कचरावेचक महीला, घंटागाडी महिला व वृत्तपत्र विक्रेत्या महीलांची भाऊबीज

0
12

दि.२५(पीसीबी)-नवी सांगवी,पिंपळ गुरव या भागातील पालिकेने ठेकेदार पद्धतीने घंटागाडीवर गाडीवर कचरा संकलन करणाऱ्या गोरगरीब महिला व वृत्तपत्रे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना मानवी संरक्षण आणि जागृतीच्या वतीने प्रत्येक महीलेस दोन साड्या आणि फराळ देऊन त्यांची भाऊबीज करण्यात आली.

आपण आपली . आपण आपली भाऊबीज आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात साजरी करत असतो परंतु आपल्या आरोग्यासाठी आणि कुटुंबासाठी हा वंचित घटक दिवाळीत सुद्धा काम करतांना बघतो आणि दिवाळीत कोणत्याही प्रकारची सुट्टी न घेता आपल्याला आरोग्यासाठी सेवा देत असतात याच भावनेतून “मदत न म्हणता कर्तव्य समजून “आम्ही आमचा दिवाळी सण साजरा न करता त्यांना काय देता येईल या भावनेतून आम्ही असा वंचित घटकासाठी समाजमुख उपक्रम दरवर्षी राबवत असतो असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले कि या आमच्या उपक्रमाची दानशूर व्यक्ती व वर्तमानपत्रे ही दखल घेतात त्यामुळेच  आमच्या कार्यकर्तेचे मनोधैर्य वाढते, या प्रेरणेमुळे अधिक जोमाने आम्ही काम करतो.

यावेळी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,महिला अध्यक्षा संजना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, गुणवंत कामगार काळुराम लांडगे,सामाजिक कार्यकर्ते गणेश वाडेकर,अरविंद मांगले,अनुराधा मांगले,आलका लोंढे,जयश्री मोरे,आभिषेक लोंढे, जयश्री मस्के इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.