महाराष्ट्रात भाजप खासदाराचा वादग्रस्त वक्तव्य: हिंदू मुलींना घरच्या घरी योग करण्याचा सल्ला, जिममुळे ‘मोठा कट’ असल्याचा दावा

0
58

दि.१७ (पीसीबी)-महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात भाजपचे खासदार गोपिचंद पडळकर यांनी एक वादग्रस्त विधान करत हिंदू कॉलेज विद्यार्थिनींना जिममध्ये जाण्याऐवजी घरच्या घरी योगा करण्याचा सल्ला दिला आहे.भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीडमधील हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना हिंदू मुलींना हा सल्ला दिला आहे हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात. त्यामुळे त्यांनी जिमला जाऊच नये, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. नुकतंच त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.पाडळकर यांनी या संदर्भात कोणाचं नाव घेतलं नाही, पण त्यांनी अशा व्यक्तींचा उल्लेख केला की “ते” मुलींना वेगवेगळ्या प्रकारे फसवत आहेत, जे एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा त्यांचा दावा आहे.

गोपिचंद पाडळकर यांच्या या विधानामुळे सध्या वाद सुरु आहे. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे, तर काहींनी त्यांचे समर्थन देखील केले आहे. या घटनेने सामाजिक माध्यमांवरही जोरदार चर्चा रंगली आहे.शिवाय ते कधी मुस्लिम तर कधी ख्रिश्चन समाजाला टार्गेट करतात. त्यामुळे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांना राज्याचे मुख्यमंत्री आवरणार आहेत की नाही? असा प्रश्न विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिवाय या परिसरातील कॉलेजमध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्या कोणत्याच पुरूषाला युवकाला प्रवेश दिला नाही पाहिजे. कॉलेजबाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांना मारून काढा. माझी आपल्या पोरींना विनंती आहे तुमच्या पाया पडतो. हे इतकं मोठं षढयंत्र आहे हे समजून घ्या’, असं हि पडळकर म्हणाले आहेत .शिवाय या परिसरातील कॉलेजमध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्या कोणत्याच पुरूषाला युवकाला प्रवेश दिला नाही पाहिजे. कॉलेजबाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांना मारून काढा अशी विंनती त्यांनी मुलींना केली आहे .