पुणे, दि. १३ – खाद्यपदार्थ आणि अन्य उत्पादनांवर दिल्या जाणाऱ्या अवैध ‘हलाल प्रमाणपत्रां’च्या विरोधात यंदा देशभरात ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान राबवण्यात येत आहे. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’, ‘हलाल सक्ती विरोधी कृती समिती’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि अन्य समविचारी संघटनांनी एकत्र येत या देशव्यापी अभियानाची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने रविवार १२ ऑक्टोबर या दिवशी गणपती चौक (रजनीगंधा साडी सेंटर), लक्ष्मी रस्ता, पुणे येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या वतीने हलाल प्रमाणित उत्पादनांवर तसेच प्रमाणपत्रावर बंदी यासाठी मुकनिदर्शन आंदोलन करण्यात आले. अशाच प्रकारचे आंदोलन पारगाव सा. मा. आणि केडगाव येथेही करण्यात आले. ‘यंदाची दिवाळी हलाल मुक्त दिवाळी’, ‘हलाल’ प्रमाणपत्राचा शिक्का असलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी करू नका , ‘हलाल प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ आतंकवाद्यांना कायदेशीर मदत करते, हे लक्षात घ्या !’, असे प्ल कार्ड हातात घेऊन धर्मप्रेमींनी निदर्शने केली.
या अभियानांतर्गत देशभरात ‘हलाल सक्ती विरोधी आंदोलने’, व्यापारी बैठका, मंडळ बैठका, जागृतीपर फलक, व्याख्याने, हस्तपत्रकांचे वितरण आणि ऑनलाईन याचिकांद्वारे व्यापक जनजागृती केली जात आहे. ‘केंद्र शासनाने हलाल सर्टिफिकेशन’ व्यवस्था बंद करण्यासाठी ‘हलाल मुक्त दिवाळी’ या अभियानांतर्गत समाजातील नागरिकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने प्रचोधनात्मक स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी हलाल सर्टिफिकेशन बाबत नागरिकांमध्ये विषय सांगून जागृती करण्यात आली. त्याला समाजातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कित्येकांनी हा विषय माहित नसल्याचे सांगितले तसेच आता ‘हलाल’ प्रमाणपत्राचा शिक्का असलेल्या कोणत्याही वस्तू खरेदी करणार नाही असे उपस्थितांनी सांगितले. केवळ दिवाळीपुरते मर्यादित न राहता, ‘हलाल मुक्त भारत’ होईपर्यंत हा लढा सातत्यपूर्ण रितीने चालू ठेवण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे.














































