मंडणगड, रत्नागिरी दि . १२ ( पीसीबी ) – मंडणगड येथील नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि न्यायव्यवस्थेतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.