दि . १० ( पीसीबी )- पुण्यासह महाराष्ट्रात सचिन घायवळ प्रकरण चांगलेच गाजत आहे. या गुन्हेगारी प्रकरणाला राजकीय वलय मिळाले असून सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी भाजप नेत्यांवर तोफ डागली आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सचिन घायवळला शस्त्रपरवाना मिळवून देण्यात मुख्ममंत्री फडणवीस यांचा सहभाग होता असा दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. अशातच, आता फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या रोहित पवारांच सचिन घायवळसोबतचा एक फोटो चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर रोहित पवार आणि सचिन घायवळ एकत्र गप्पा मारत असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात विरोधकांचाही सहभाग असल्याची चर्चा सुरु आहे. हा फोटो कोणत्या ठिकाणाचा आहे? याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हा फडणवीस यांच्या टीकेनंतर हा फोटो चर्चेला विषय ठरला आहे. शस्त्र परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का ? असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला.
दुसरीकडे, रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. निलेश घायवळने केलेल्या मदतीचे सुनंदा पवार यांनी जाहीर कौतुक केले होते.
कोव्हिड काळात निलेश घायवळने शाळेला मदत केल्याने सुनंदा पवार यांनी त्यांचे आभार मानले होते. निलेश भाऊंचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही खूप गरजेची गोष्ट या शाळेला दिली. याच्यासाठी तुमचे मनापासून आभार, असं सुनंदा पवार व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.