डॉ. बिपिन इटनकर पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त?

0
78

पिंपरी, दि. ९ – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटचे अधिकारी आता एकेकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचे सर्वेसर्वा होणार असल्याची चर्चा आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक येथील कुंभमेळा आयुक्त म्हणून बदली झाल्याने तूर्तास मेट्रोचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पदभार आहे. आता शहराचे नवीन आयुक्त म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. बिपिन इटनकर यांची नियुक्ती होणार असल्याचे समजते.

मूळ चंद्रपूरचे जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉ. इटनकर यांची अत्यंत कार्यक्षम, शिस्तबध्द आणि संवेदनशील अधिकारी अशी ओळख आहे. २०१४ च्या महाराष्ट्र कॅडरमधील भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत, ज्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी २ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. निवडणूक आयोगाच्या ‘मिशन युवा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ मिळाला. मराठी, इंग्रजी बरोबरच मैथिली भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.