ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

0
39

 मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील पिंजरा हा एक अविस्मरणीय चित्रपट मानला जातो .या चित्रपटात आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि अप्रतिम नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे 87 व्या वर्षी निधन झाले आहे.


मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली. झनक झनक पायल बाजे ,दो आखे बारा हात ,आणि विशेषता पिंजरा चित्रपटातील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील .व्ही. शांताराम यांच्या नवरंग या चित्रपटातून अभिनेत्री संध्या शांताराम यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना चकित केले .अरे जा रे हट नटखट हे त्यांच्यावर चित्रित केलेले गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आहे .

संध्या शांताराम यांचे मूळ नाव विजया देशमुख होते .या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले. त्यावेळी कोणतेही नृत्य दिग्दर्शक नसल्याने गाण्यात दिसणाऱ्या सर्व स्टेप्स संध्या यांनी स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी तयार केल्या होत्या .हे गाणे आगळे वेगळे बनवण्यासाठी शांताराम यांनी सेटवर खरे हत्ती आणि घोडे आणले होते .व्ही शांताराम विवाहित असूनही त्यांनी संध्या यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने आणि प्रखर प्रतिभेने भुरळ घातली .त्यानंतर संध्या यांनी शांताराम यांच्या अनेक नामांकित चित्रपटात काम केले.