शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी झाला प्राण घातक हल्ला

0
3

दि.०४(पीसीबी)- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी झाला प्राण घातक हल्ला झाला आहे. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

महेश चिवटे हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. आपल्यावर झालेला हल्ला हा दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांची सुपारी घेऊन करण्यात आल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होते. तर त्यांची बहिणी रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. चिवटे यांच्या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा समोर आला आहे.

करमाळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर यांच्यावर हा प्राणघातक हल्ला सकाळी झाल्याची माहिती समोर आली, महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. महेश चिवटे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्यावरती या हल्ल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. सध्या शिंदेंच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले होते. मात्र आज सकाळी महेश चिवटे शेतातून येत होते त्यावेळी त्यांच्यावर हा प्राण घातला झाला. हा हल्ला रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून झाल्याचं गंभीर आरोप केला आहे. दिग्विजय बागल यांनी विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांची उमेदवारी घेऊन लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे देखील आले होते, मात्र जिल्हाप्रमुख महेश चिमटे आणि बागल यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे, यानंतर आता याचा रूपांतर हल्ल्यात झाला आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत तपास सुरू आहेत संपूर्ण तपासानंतर सर्व गोष्टी समोर येते.