दि.२६(पीसीबी)-अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आयात शुल्काचं ‘हत्यार’ उपसलं आहे. १ ऑक्टोबरपासून औषधांवर १००%, स्वयंपाकघरातील कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीजवर ५०%, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर ३०% आणि ट्रकवर २५% आयात शुल्क लागू केल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. या निर्णय भारतालादेखील फटका बसू शकतो.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर पोस्ट करून वाढीव आयात शुल्काबाबतची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट म्हटले, “१ ऑक्टोबर २०२५ पासून, आम्ही सर्व ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनावर १००% कर लादणार आहोत. जर एखादी कंपनी अमेरिकेत त्यांचा औषध कारखाना सुरू करत नाही, तोपर्यंत हे आयात शुल्क असेल. जर, एखाद्या औषध कंपनीचे बांधकाम सुरू झाले असेल तर त्यांच्या औषध उत्पादनांवर कोणताही कर लागू होणार नाही. २०२४ मध्ये अमेरिकेनं सुमारे २३३ अब्ज डॉलर किमतीची औषधी उत्पादने आयात केली होती. अमेरिकेनं विदेशातून आयात होणाऱ्या औषधांवर आयातशुल्क लादल्यानं काही औषधांच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेतील आरोग्य सेवा खर्च तसेच आरोग्य विम्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील नागरिकांवर काय परिणाम होईल?-कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्समधील स्ट्रॅटेजिक पॉलिसी आणि सप्लाय चेनचे उपाध्यक्ष पास्कल चॅन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तात्काळ औषधांच्या किमतीत होणारी वाढ, विमा व्यवस्थेवरील ताण आणि रुग्णालयांची कमतरता या कारणामुळे अमेरिकन लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. ट्रम्प म्हणाले, विदेशी बनावटीचे जड ट्रक आणि सुटे भागमुळे देशांतर्गत उत्पादकांना त्रास होत आहे. त्यामुळे त्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे. आयात शुल्क वाढीमुळे पीटरबिल्ट, केनवर्थ, फ्रेटलाइनर, मॅक ट्रक्स आणि इतर सारख्या मोठ्या ट्रक कंपन्यांना बाहेरील उत्पादकांच्या अडचणींपासून संरक्षण मिळेल.
अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर यापूर्वीच ५० टक्के आयातशुल्क लादलं आहे. नुकतेच एच१ बी व्हिसासाठी सुमारे ८८ लाख रुपये शुल्क लागू केलं आहे. त्यापाठोपाठ औषधांवर १०० टक्के आयात शुल्क आणि अवजड ट्रकसह त्यांच्या सुट्ट्या उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. त्याचा भारतीय निर्यातक्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकशी संबंधित कराराला मंजुरी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे टिकटॉकचं नियंत्रण अमेरिकेकडं असणार आहे. ओरेकल कॉर्पोरेशनसारख्या कंपन्याकडं टिकटॉक प्लॅटफॉर्मची सुरक्षा सुनिश्चित करण्याची महत्त्वाची जबाबदार असणार आहे. गेल्या आठवड्यात व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्मचे कामकाज अमेरिकेत सुरू ठेवण्यासाठी टिकटॉक कराराला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मान्यता दिल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.