तरुणीच्या इंस्टाग्राम फोटोमधील ड्रेस काढून टाकण्यासाठी AI चा वापर

0
96

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका तरुणीच्या फोटोमध्ये अश्लील बदल करण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका 20 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी भारतीय दंड विधान (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पीडित तरुणीच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. या अकाउंटवरून त्याने तरुणीला मेसेज पाठवणे सुरू केले. जेव्हा तरुणीने त्याला पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली, तेव्हा आरोपीने तिच्या एका इंस्टाग्राम फोटोमधील ड्रेस काढून टाकण्यासाठी AI चा वापर केला आणि तो फोटो तिला पाठवला.इतकंच नाही, तर आरोपीने अशाच प्रकारे तिचे आणखी अश्लील फोटो तयार करून ते व्हायरल करण्याची धमकीही दिली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची नोंद घेतली असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. सायबर गुन्हेगारीमध्ये AI चा वापर करून अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे हे एक नवीन आणि गंभीर स्वरूप समोर आले आहे