सुळे, दादा आणि साहेबांचा एकत्र बॅनर चर्चेत

0
72

“विचार वेगळे असले तरी आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत”पुण्यात शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा एकाच बॅनरवरचा फोटो लावण्यात आला आहे. “विचार वेगळे असले तरी आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत” असा या बॅनरवरचा संदेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावला आहे. बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, गरज पडल्यास ताई आणि दादा पुन्हा एकत्र येतील यावर त्यांना विश्वास आहे. या फोटोमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करण गायकवाड यांनी हा बॅनर लावला आहे.