मा.श्री.विकासभाऊ साने यांच्या पाठपुराव्याला यश..!!

0
61

उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांना प्रभाग क्रमांक १ मधील चिखली गावठाण, मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, पाटील नगर, रामदास नगर, सोनवणे वस्ती आणि शेलार वस्ती येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी आवश्यक त्या बजेटवाढीसंदर्भात विनंतीपत्र माननीय श्री. विकासभाऊ साने यांच्या वतीने सादर करण्यात आले.

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी माननीय शहर अभियंत्यांना बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी बैठक घेण्याचे निर्देश दिले असून हा प्रश्न मार्गी लागला असून , लवकरच डांबरीकरण होणार आहे.

याशिवाय, गट क्रमांक १६५३ या भूखंडावरील किमान ०५ एकर क्षेत्र गावजत्रा मैदान म्हणून आरक्षित करण्याबाबतचे विनंतीपत्र देखील मा.अजितदादांकडे सादर करण्यात आले आहे. वरील दोन्ही विषयांवर येत्या बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी अंतिम सकारात्मक निर्णय निश्चित होणार आहे.

श्री.विकासभाऊ साने