दि . २१ . पीसीबी आज ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरीच्या फुगेवाडी येथे अशोक हॉटेलला सदिच्छा भेट दिली. यावेळी कराटे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व स्थानिक नागरिकांसोबत मनमोकळ्या गप्पा झाल्या. विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वतंत्र प्रागतिक विचार माझ्यासमोर मांडले तसेच नागरिकांनी आपले विषय सादर केले.
यादरम्यान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलं. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे विठोबा-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांना संबोधित केले.