बंडू आंदेकरच्या अडचणीत आणखी वाढ

0
4

दि.१९(पीसीबी)-आयुष कोमकर हत्याप्रकरणी मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह त्याचा संपूर्ण परिवाराला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बंडू आंदेकरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जेलमध्ये असतानाही बंडू आंदेकरच्या नावावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच तातडीने अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी साडे चारच्या सुमारास पोलिसांनी नागेश्वर मंदिर परिसरात सोमवार पेठे येथे कारवाई करत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ५६६५ रुपये जप्त केले. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सात जणांवर कारवाई
ज्ञानोबा दत्तू सुपारे, नितीन धोंडू पांचाळ, मनोज गोविंद पवार, दिलीप तुकाराम पालकर, संतोष रामचंद्र कड, प्रविण उर्फ बाला राजेंद्र चव्हाण.