पिंपरी, दि. १७ :पिंपरी चिंचवड मराहाठी पत्रकार संघ व स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या वतीने येत्या रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी निगडी प्राधिकरणात पत्रकार व कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर व दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. या शिबिरात जपानी टेक्नॉलॉजी मशीनच्या साह्याने फुल बॉडी चेकअप ( संपूर्ण शारीरिक तपासणी) केली जाणार आहे.
स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सेक्टर नंबर 27 प्राधिकरण, काड सिद्धेश्वर मठाशेजारी, शाळू एजन्सी शेजारी रविवारी सकाळी दहा ते एक या वेळेत हे शिबिर होणार आहे. जपानी टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने शरीराच्या पूर्ण तपासण्या करण्यात येणार आहेत. डॉ. महेंद्र पाटील,डॉ. अमित नेमाणे, तसेच डी वाय पाटील आयुर्वेद वैद्यकीय विभागाचे टीम विविध प्रकारच्या तपासण्या व मार्गदर्शन करणार आहे. मधुमेह,ट्युमर, गुडघेदुखी, हाडांचे फ्रॅक्चर, रक्तदाब,डोळ्यांचे आजार, अल्सर,कॅन्सर,विस्मरण, श्वसनाचे विकार,सोरायसिस, त्वचा विकार, दंतविकार,यूरिन इन्फेक्शन,पोटाचे त्रास,मुतखडा, याबाबतच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. संपूर्ण शरीर तपासणी बरोबरच आयुर्वेदिक चाचण्या दंत तपासणी डोळे तपासणी केली जाणार असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष सातुर्डेकर यांनी सांगितले. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.