दि.१५(पीसीबी)- राज्यात महायुतीचे सरकार असूनदेखीत सत्ताधारी पक्षांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपने त्यांच्या होमपिचवरच धक्का दिला आहे. मावळ तालुक्यात सध्या राजकीय भूकंपाची परिस्थिती निर्माण झाली आहे.मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे आमदार आहेत. याच ठिकाणी भाजपने गळ टाकली असून बडा नेता अन् कार्यकर्त्ये गळाला लागले आहेत.
बापू भेगडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुनील शेळके यांना अडचणीत आणण्यासाठी बाळा भेगडे यांनी मोठा डाव टाकला असून राष्ट्रवादीला मावळात धक्का देण्याची तयारी त्यांनी केली आहे. महायुतीविरोधात काम केल्यामुळे बापू भेगडे यांना आधीच पक्षातून निलंबित करण्यात आले होते, तेच भेगडे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भेगडे यांचे मावळमध्ये मजबूत संघटन आहे, तसेच संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी भाजप सुरु केलेल करेक्ट कार्यक्रम सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे.
बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे मावळमधील कट्टर राजकीय विरोधक आहेत. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शेळके यांनी तत्कालीन भाजप आमदार बाळा भेगडे यांचा पराभव करून मोठा विजय मिळविला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे. महायुतीविरोधात काम केल्यामुळे बापू भेगडे यांना आधीच पक्षातून निलंबित करण्यात आले होते, तेच भेगडे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.