पुणे म्हाडाची ४,१८६ घरांसाठी लॉटरी

0
134

पुणे, दि. १४ -: पुण्यात तुम्हाला आपल्या हक्काचं आणि स्वप्नातलं घर घ्यायचं आहे का? मग तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कारण, म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ४,१८६ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठ्या आयटी हबपैकी एक असलेल्या पुणे शहरात हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून बांधण्यात आलेल्या घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या लॉटरीत एकूण ४,१८६ घरांचा समावेश आहे. तर १९८२ घरी ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नुसार विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पंतप्रधान आवास योजना (PMAY), १५ टक्के सामाजिक, २० टक्के सर्वसमावेशक आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत एकूण ६,१६८ घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

१५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत असलेली घरी ही उर्से, जांबे (ता. मुळशी) परिसरात आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरे ही पुणे महानगरपालिका हद्दीत, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील घरे चाकण-म्हाळुंगे, शिरुर, सोलापूर – करमाळा, सांगली – मिरज, सांगली – कर्नाळा रोड, सोलापूर – शिवाजीनगर, सांगली – संजय नगर, सांगली – पळूस, कोल्हापूर – कागल, सांगली – कर्नाळ रोड, सोलापूर – पंढरपूर, चाकण – महाळुंगे – इंगळे, सांगली – अभयनगर, जुळे सोलापूर परिसरात आहेत.
या संगणकीय सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याकरिता https://housing.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा आपल्या मोबाईलमध्ये MHADA Lottery हे ॲप डाऊनलोड करा.
महत्त्वाच्या तारखा
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात – 11 सप्टेंबर 2025 (दुपारी 12.30 वाजल्यापासून)
ऑनलाईन रक्कम स्विकृती सुरुवात – 11 सप्टेंबर 2025 (दुपारी 12.30 वाजल्यापासून)
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2025 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
ऑनलाईन रक्कम स्विकृती अंतिम तारीख – 31 ऑक्टोबर 2025 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची तारीख – 1 नोव्हेंबर 2025 (संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)
सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी – 11 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
दावे, हरकती दाखल करण्याची तारीख – 13 नोव्हेंबर 2025 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी – 17 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
सोडत दिनांक – 21 नोव्हेंबर 2025 (दुपारी 12 वाजता)
यशस्वी अर्जदारांची नावे वेबसाईटवर प्रसिद्ध करणे – 21 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)

लॉटरीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. जाहिरातीची पीडीएफ कॉपी पाहण्यासाठी Pune MHADA Lottery 2025 notification pdf या लिंकवर क्लिक करा.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर वाटप करण्यात येणाऱ्या घरांसाठी म्हाडातर्फे lottery.mhada.gov.in या वेबसाईटसोबतच bookmyhome.mhada.gov.in ही वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. ही घरे सोडतीमध्ये मागणी अभावी शिल्लक असल्यामुळे या वेबसाईटवर वितरणासाठी उपलब्ध होणाऱ्या घरांसाठी स्वतंत्ररित्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार नाही.